विराट कोहलीबाबत गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Gautam Gambhir | टीम इंडियाचा हेड कोच होताच गौतम गंभीर आणि टीम इंडियाच्या निवड समितीचा सदस्य अजित आगरकर यांची पत्रकार परिषद झाली. अशातच आगामी टी20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार आहे. तर वनडे सामन्यांसाठी रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) विराट कोहलीबाबत वक्तव्य केलं आहे.

“विराट आणि माझे नाते…”

विराट कोहली आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात वाद होता. हे अनेकांना ठाऊक आहे. आयपीएलमध्ये हा वाद निर्माण झाला होता. मात्र आता गौतम गंभीर (Gautam Gambhir) टीम इंडियाचा हेड कोच झाला आहे. त्यानंतर आता विराटाबाबत गौतम गंभीरने मोठं वक्तव्य केलंय. तो म्हणाला की, आमच्या दोघांबाबत जे काही सुरू आहे ते टीआरपीसाठी पोषक आहे. मात्र विराट आणि माझे नाते चांगले आहे. आम्ही 140 कोटींचं प्रतिनिधित्व करणार आहोत, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

कोच झाल्यानंतर एका पत्रकारने गंभीरला सवाल केला, हेड कोच झाल्यानंतर तुमचं विराटशी बोलणं झालं का? असा गंभीरला सवाल करण्यात आला होता. त्यावर गंभीर म्हणाला की, हो! आमचं मसेजद्वारे बोलणं झालं आहे. कुठे, कसं, कधी, कशाबाबत बोलणं झालं? हे सांगणार नसल्याचं गौतम गंभीर म्हणाला. मी विराटची खूप इज्जत करतो. आशा आहे एकत्र येऊन टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करू, असं गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला.

विराटच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष

विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने टी20 विश्वचषकातून निवृत्ती घेतली आहे. आता टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे.  विराट आता वनडेमध्ये कशी कामगिरी करणार आहे हे पाहणं गरजेचं आहे.

आगामी होणाऱ्या वनडे विश्वचषकात टीम इंडियातील वरीष्ठ क्रिकेटर खेळाडू विश्रांती घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता वरीष्ठ खेळाडूने खेळावं असं गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला. यावेळी त्याने विराटने देखील श्रीलंकेविरोधात खेळावं असं सांगितलं होतं.

टी 20 विश्वचषकानंतर श्रीलंका विरूद्ध वनडे सामने सुरू होण्याआधी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीरने वरीष्ठ खेळाडूंना खेळण्याची तंबी दिली आहे. विराटने देखील श्रीलंकेविरूद्ध खेळावं असं सांगितलं आहे.

News Title – Gautam Gambhir Spoke On Virat Kohli Relation

महत्त्वाच्या बातम्या

सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या एकच महिन्यांनी दिली गुड न्यूज?, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले..

“पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात भांडण झालंय, त्यांनी..”; संजय राऊत यांची टीका

राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस, NDRF ची टीम तैनात

राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या, ‘या’ भागांना आज हायअलर्ट