बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिल्ली मरतेय, थोडीतरी लाज असेल तर राजीनामा द्या”

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. यामध्ये देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येसुद्धा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे. दिल्लीमध्येसुद्धा कोरोनाचे आकडे वाढत आहेत तर आपल्या राज्याप्रमाणे दिल्लीतही बेडची कमतरता जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी केजरीवालांवर निशाणा साधला आहे.

कोणतीही दूरदृष्टी नाही, कोणतेही दिशानिर्देश नाहीत. अरविंद केजरीवाल, दिल्ली दिवसेंदिवस मारत आहे. तुमच्यात थोडी तरी लाज असेल, तर राजीनामा द्या, अशा शब्दात गौतम गंभीर यांनी टीका केली आहे. याबाब गंभीर यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी केजरीवाल यांना टॅग केलं आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्रीपासून 19 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा करुन सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत आपण परिस्थिती चांगली हाताळली आहे. दिल्लीतील आरोग्य व्यवस्था सध्या सीमेवर आहे. कोणत्याही यंत्रणेच्या आपल्या मर्यादा आहेत, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गौतम गंभीर यांनी केलेल्या टीकेला अरविंद केजरीवाल काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही”

“कोरोनाची दुसरी लाट आणि त्या लाटेचं व्यवस्थापन ही मोदी निर्मित ट्रॅजेडी”

“नाशिक महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”

“आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण…”, नाशिकमध्ये घडलेल्या घटनेवरून राज ठाकरे आक्रमक

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रया; म्हणाले…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More