देश

भाजप खासदार गौतम गंभीर यांच्याकडून दीपिकाचं समर्थन, म्हणाले…

नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) काही अज्ञात गुंडांनी घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. याचा निषेध म्हणून जेएनयूत केलेल्या आंदोलनाला उपस्थिती लावत दीपिका पादुकोणनं विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे तिच्यावर टीका होत होती. अशातच भाजप खासदार गौतम गंभीर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गौतम गंभीर यांनी अभिनेत्री दीपिकाचं समर्थन केलं आहे. दीपिका पादुकोण जेएनयूमध्ये गेल्या ही चांगली गोष्ट आहे. लोकशाहीने तसा अधिकारच त्यांना दिला आहे. दीपिका यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली हे स्वागतार्ह आहे, असं ते म्हणाले आहेत.

गंभीर यांनी दीपिकाचं समर्थन करत असतानाच तिच्यावर टीकाही केली आहे. त्याच दिवशी निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली. दीपिका यांनी निर्भयाच्या पालकांनाही भेट द्यायला हवी होती, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. अनेक कलाकार विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ समोर आल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग बातम्या-

नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी; भाजपकडून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं प्रकाशन

BCCI कडून जसप्रीत बुमराहचा सन्मान; दिला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार

“जे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं त्याचंच पालन आम्ही करतोय”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या