पुणे महाराष्ट्र

सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर अखेर सापडले!

पुणे | पुण्यातील बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर हे पुणे क्राईम ब्रांचला राजस्थानमध्ये सापडले आहेत. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये गौतम पाषाणकर थांबले होते.

युनिट 1 चे पोलीस निरीक्षक ताकवले यांना गौतम पाषाणकर हे राज्याबाहेर गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपासाची चक्र फिरवली.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील जयपूर येथून, त्यांना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे.

नातेवाईक, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनीही पाषाणकर यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरु झाली. यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.

आम्ही या महाष्ट्राची औलाद आहोत, शहीद होऊ पण…- संजय राऊत

‘उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण माहीत नव्हता’; शरद पवारांचा दानवेंना टोला

“त्यांचे बाप नव्हते तेव्हापासून भाजपमध्ये काम केलं, आता आयत्या पिठावर रेघा मारत आहेत”

शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या