मुंबई | जिओ (Jio) आणि एअरटेल(Airtel) या दोन कंपन्या नागरिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. यातच आता एका नवीन स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. आशियातील एक श्रीमंत व्यक्ती गौतम आदानी यांचा एक नवीन व्हेंचर सुरू करत आहेत. त्यामुळे आता जिओ कंपनीचे मालक मुकेश अंबानी आणि एअरटेल कंपनीचे मालक सुनील भारती मित्तल याना टक्कर देण्यासाठी ते उतरणार आहेत.
केंद्रीय मंत्रीमंडळाने 5G स्पेक्ट्रमला परवानगी दिली आहे. दुरसंचार कंपन्या या लिलावाची अनेक दिवस वाट पाहत होत्या. अर्ज करण्यासाठी 8 जुलै ही शेवटची तारीख होती.यासाठी सरकाकडे चार अर्ज आले आहेत.
यामध्ये एअरटेल, जिओ, वोडाफोन-आयडिया यांनी 26 जुलै च्या लिलावासाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये आता अर्ज दाखल करणारी चौथी कंपनी अदानी ग्रुप आहे. यासाठी कंपनीने हल्लीच परवाना मिळवला आहे. अदानी समूहाने याबाबत काॅल किंवा मेल केला नाही. त्यामुळे याची खात्री होऊ शकली नाही.
5G ची सेवा 20 वर्षे चालण्यासाठी केंद्र सरकार जुलै अखेर 72097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करेल. लिलावतीत यशस्वी होणाऱ्या कंपन्यांना 5G च्या सेवा प्रदान करण्यात येतील. या लिलावाची किंमत 5 लाख कोटी इतकी असेल. या लिलावात कंपन्या 600, 1800, 2100, 2300 आणि 2500 मेगाहर्टज साठी अर्ज करतील.
थोडक्यात बातम्या
…अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विठ्ठलाची महापूजा करता येणार नाही!
Elon Musk यांनी ट्विटरसोबतचा करार केला रद्द; धक्कादायक कारण समोर
“106 हुतात्म्यांनी मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही, 106 जण ती जावी म्हणून दिवस-रात्र झटतायत”
काँग्रेसचे ते सात आमदार अडचणीत; हायकमांड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना इशारा, म्हणाले ‘हिंमत असेल तर…’
Comments are closed.