Gautami Patil l राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवीन नेत्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. अशातच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांना देखील अमरावतीमधील एका कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र यावर गौतमीने स्पष्ट शब्दात त्यांना उत्तर दिले आहे.
गौतमी पाटील राजकारणात येणार? :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अमरावती येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमाला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर तिला एक प्रश्न विचारण्यात आला की, तुमची लोकप्रियता ही एखाद्या राजकीय नेत्याइतकी आहे. मग तुम्ही राजकारणात जाण्याचा विचार कधी केला आहे का? किंवा तुमचा तसा काही विचार आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला विचारण्यात आला.
यावर गौतमी पाटील स्प्ष्टपणे म्हणाली की, मी अगोदरचं म्हटलं आहे की, राजकारणाचा आणि माझा कसलाही संबंध नाही. मी एक कलाकार आहे. त्यामुळे मी कला दाखवते. मी डान्स करते, बाकी काहीही नाही. तसेच मी राजकारणात अजिबात जाणार नाही, असं गौतमी म्हणाली आहे.
Gautami Patil l कुणाच्या दबावाखाली राहू नका :
गौतमी पुढे म्हणाली की, मी पश्चिम विदर्भात पहिल्यांदाच आले आहे. कारण अमरावतीमध्ये येण्याची माझी हि पहिलीच वेळ आहे. सकाळपासून मी प्रेक्षकांचं प्रेम पाहते आहे. त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत.
तसेच अमरावतीमध्ये देखील बाहेरुन अनेक मुलं-मुली शिकायला येत असतात. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, असा प्रश्न गौतमी पाटीलला विचारण्याता आला. त्यावर गौतमी म्हणाली की, इथे बाहेरगाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मीसांगते की, स्वतःची काळजी घ्या. लढायचं असेल तर बिनधास्त लढा. मात्र कुणाच्या दबावाखाली राहू नका आणि आवर्जून नडा असं गौतमी पाटील म्हणाली आहे.
News Title – Gautami Patil Entered Politics
महत्त्वाच्या बातम्या-
गणेश चतुर्थीला राशीनुसार करा हे उपाय, होईल मनातील इच्छा पूर्ण
भारतात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान अव्वल, आकडा ऐकून थक्क व्हाल
निवडणुकीआधीच भाजपला मोठे झटके; यादी जाहीर होताच राजीनाम्याची लाट
महत्वाची बातमी! तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदलला
“अरे मर्दांनो उठा, त्या ‘फिक्की’चा माज उतरवा..”; पुष्कर जोग निक्की तांबोळीवर भडकला