गौतमी पाटील पुन्हा अडचणीत; कार्यक्रमांवर बंदी येणार?

खेड | गौतमी पाटील (Gautami Patil) च्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्या दिलखेच अदांनी आणि सौंदर्याने तरुणाईला भूरळ घालणारी गौतमी पाटील आता मोठ्या अडचणीत सापडली आहे.

गौतमीचे कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न होतोय. तर काही भागात कार्यक्रमांवर बंदी, गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

बहिरवाडी गावच्या भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौतमी पाटीलच्या अदाकारीवर प्रेक्षक बेभान होऊन थिरकले. मात्र या कार्यक्रमामुळे आता पुन्हा एकदा गौतमी पाटील (Gautami Patil) अडचणीत आली आहे.

तरूणांनी गौतमीच्या कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली.

गावच्या महिलांनी अखेर दांडक्याने धुडगूस घालणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. तरीही प्रत्येक कार्यक्रमात तरुण धुडगूस घालत असल्याने गौतमीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-