गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट झाली, लावणीला डाग लागला- डॉ. चंदनशिवे

Gautami Patil | गौतमी पाटील (Gautami Patil) हिला या महाराष्ट्रात कोण ओळखत नाही असं नाही. तिला या राज्यात डान्सर म्हणून सर्वच ओळखतात. सबसे कातिल गौतमी पाटील असा तिच्या नावाचा उद्धार करत तरूण पिढी गौतमीचं नाव घेतात. मात्र गौतमी पाटील (Gautami Patil) ही लावणी करत नाही ती आयटम साँग करते पण महाराष्ट्रातील जनतेने तिच्या नाचाला लावणीवर खपवलं आहे, असं मुंबई विद्यापिठाचे लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी एका मुलाखतीत बोलत असताना भाष्य केलं आहे.

सिनेपत्रकार अमोल परचुरे हे केवळ सिनेमांसंबंधीत सिनेक्षेत्रातील कालाकारांची मुलाखत घेत असतात. अशातच आता त्यांनी डॉ. चंदनशिवे यांची एक मुलाखत घेतली आहे. ‘कॅच अप’ असं अमोल परचुरे यांच्या शोचं नाव असून तमाशाप्रधान चित्रपटात तमाशाचं चित्रण, तंबूतल्या अस्सल गोष्टी, तमाशातील अस्सल आजच्या गोष्टी, लोकशाहिरांचं योगदान, लोकलला अकादमीमधून सुरू असलेला लोककलेचा प्रचार, बॉलिवूडचा अनुभव अशा विविध विषयांवर भाष्य केलं गेलं.

यावेळी बोलत असताना गणेश चंदनशिवे म्हणाले की, ज्यापद्धतीने नटरंग सिनेमात सोनाली कुलकर्णी दाखवण्यात आली आहे. तशी तमाशाच्या बोर्डावर दाखवता येणार नाही. त्यानंतर लावणी कोणामुळे भ्रष्ट झाली असा सवाल करण्यात आला त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट झालीये- डॉ. चंदनशिवे

डॉ. चंदनशिवे यांनी लावणी भ्रष्ट होण्यामागे गौतमी पाटीलला (Gautami Patil) जिम्मेदार ठरवलं आहे. कारण ते बोलत असताना म्हणाले की, मध्यंतरी एक गौतमी पाटील (Gautami Patil) नावाची एक मुलगी आहे. ती खरं तर आयटम साँग करते. मात्र लोकांनी तिचा नाच हा लावणी म्हणूनच खपवला आहे. त्यामुळे आता लावणी ही भ्रष्ट झाली आहे, असं डॉ. चंदनशिवे म्हणाले आहेत.

लावणीला एवढा मोठा इतिहास दिला आहे त्याला मोठा डाग लागला आहे. तिच्यावर (गौतमीवर) जेव्हा टीका होऊ लागली तेव्हा तिने स्वत:ही मान्य केलं की मी लावणी करत नाही. मी आयटम साँग करते, असं डॉ. चंदनशिवे म्हणाले आहेत.

लक्ष्मी बाई, यमूना बाईंची परंपरा आहे. शकुबाई, कोल्हापूरकर बाईची परंपरा आहे. डोईवरचा पदर हटू न देता सुलोचना बाईंनी रजत पटावर गाणं गायलं होतं. तुम्ही आयटम साँग करत आहात. स्टेजवर फवारे मारत आहात. त्यात तुम्ही कसे दिसत आहात याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. यामुळे आताच्या लोकांना वाटतं की हिच परंपरा आहे.

“लावणी ही कधीच अर्धनग्न नाही”

परदेशातील मुलींना घेऊन लावणी केली तरीही चालेल मात्र त्यात पारंपारिक फडावरील मुली असतील तर ते भरून निघेल. लावणी ही कधीच अर्धनग्न नाही. ती केसापासून नखापर्यंत सजलेली आहे. तिची चोळी ही स्लिव्हलेस नाही. तिची पाठ दिसत नाही. तिच्या कंबरेला पट्टा असतो. पायात पाच पाच किलोचं घुंगरू आहेत. ही लावणीची संस्कृती आपण जपायला हवी.

News Title – Gautami Patil Lavani Corrupt Said Mumbai University Dr. Ganesh Chandanshive On Tamasha

महत्त्वाच्या बातम्या

‘मनुस्मृती मनातून…’; प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाडांना सुनावलं

डॉ. श्रीहरी हळनोरची मोठी कबुली; डॉ. अजय तावरेच्या अडचणी वाढणार

वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, धक्कादायक माहिती आली समोर

Biwi No: 1 सिनेमा गोविंदाने का सोडला?, 25 वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण

किंग खानला हरवून दीपिका पदुकोण बनली ‘क्वीन’! पाहा IMDb Top लिस्ट