गौतमी पाटीलला भाजप नेत्याकडून मिळाला पुरस्कार
मुंबई | अगदी कमी कालावधीत प्रसिध्द झालेली गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. अनेकदा तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला प्रचंड राडा आणि गर्दी होते. आपल्या नृत्याच्या जोरावर गौतमी यशाच्या शिखरावर पोहचली आहे.
गौतमीला विरोध करणाऱ्यांची संख्या कमी नाही. गौतमीच्या लावणीत अश्लिलता (Obscenity) आहे, असं म्हणत अनेक कलाकारांनी आणि संघटनांनी तिच्या लावणीवर बंदी घालावी अशी मागणी केली होती. या गोष्टीनं अनेकदा राजकीय वळण देखील घेतलं आहे. यातच आता सध्या एका गोष्टीची चर्चा सुरु आहे.
अश्लिलतेच्या डान्स करते असा टॅग गौतमीला बसला असताना गौतमीला तिच्या मायभूमीतून अभिमानास्पद वागणूक मिळाली आहे. याबाबत गौतमीनं तिच्या इंस्टाग्रॅमवर (Instagram) पोस्ट करत सांगितलं आहे. ‘खान्देश कन्या’ म्हणून गौतमीचा गौरव करण्यात आला आहे.
याचविषयी सांगताना गौतमीनं लिहलं आहे. माजी मंत्री तथा आमदार मा.श्री. जयकुमारभाऊ रावल (Jayakumarbhau Rawal) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार मा.श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देश कन्या म्हणून गौरव करुन सत्कार करण्यात आला.
त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, असाच मायेचा हाच सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना… जय खान्देश, असं गौतमीनं म्हटलं आहे. मध्यतंरी गौतमीमुळं अजित पवारांनी (Ajit Pawar) अशा कार्यक्रमाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.