पुणे | सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil), गौतमीकी झलक सबसे अलग….. सध्या लावणी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटीलचं. गौतमीच्या नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करतात. यशाच्या शिखरावर असलेली ही गौतमी तिच्या एका कार्यक्रमसाठी किती मानधन घेते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
गौतमी एक असं नाव जिनं आपल्या लावणीमुळं रातोरात स्टार झाली आणि स्वत:च अस्तित्व निर्माण केलं. तिच्या नृत्याची सध्या सगळीकडंच जोरदार चर्चा होतेय. गौतमीची लावणी आणि तूफान गर्दी हे समीकरण आता सगळ्यांनाच ठाऊक झालय. पण या गौतमीला बऱ्याचदा ट्रोलही केलं. गौतमीच्या लावणीत अश्लीलता असते, असं म्हणत अनेक संघटना आणि कलाकारांनी तिच्या लावणीवर बंदी घालावी, अशी मागणी केली. परंतु गौतमीच्या कार्यक्रमांना याचा तीळमात्र फरक पडलेला दिसत नाही. कारण अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक गैातमीची लावणी पाहायला गर्दी करताना दिसतातय. पण आपल्याला गौतमीचं जे यश दिसतय त्या यशामागे तिचा मोठा संघर्षही आहे. लहानपणीचा तिला कठिण परिस्थीतीला समोरे जावे लागले आहे.
गौतमीचा जन्म धुळ्यातील शिंदखेडा या जिल्ह्यात झाला. तिच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसानंतर तिचे वडिल तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. यानंतर गौतमी तिच्या आईसह तिच्या आजोळी राहू लागली. आर्थिक परिस्थीती बेताची असल्यानं ती डीजे शोमध्ये डान्सर म्हणून काम करायची. तेव्हापासून तिची डान्सर म्हणून ओळख आहे. लहानपणीपासूनच गौतमीला शहराता -गावात शोसाठी आवर्जून बोलावलं जायचं.
कालांतराने गौतमी आणि तिची आई पुण्यात राहायला आले. पण तिच्या आईचा पुण्यात पी एमटी बसमधून पडून अपघात झाला. या अपघातामुळं उदर्हनिर्वाची सोय करण्याची जबाबदारी गौतमीवर आली. त्यावेळी गौतमी अनेक ठिकाणी बॅक डान्सर म्हणून काम करायची. यावेळी गौतमीला फक्त ५०० ते १००० रूपये मिळायचे.
गौतमीनं असच अनेक दिवस काम करत आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडली. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी तिचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आणि तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आता या यशाच्या आणि प्रसिद्धीच्या जोरावर गौतमी एका शोसाठी दीड ते दोन लाख रूपये घेते.
महत्त्वाच्या बातम्या-
- “रामदेव बाबांवर आधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे”
- विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; बसचा भीषण अपघात
- मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
- सत्यजित तांबेंबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
- ‘माझ्या जिवाला धोका’, उर्फीने केली मोठी मागणी