मुंबई | महाराष्ट्रभर गौतमी पाटीलच्या(Gautami Patil) लावणीची(Lavani) क्रेझ आहे. तिचे कार्यक्रम पाहण्यास प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. तिचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल होताना दिसत आहे.
गौतमी तिच्या लावणीमुळ नेहमीच चर्चेत येत असते. त्यातच अलीकडं काहीजण तिच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी करत असल्यानेही ती चर्चेत आली होती. परंतु सध्या गौतमी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
सध्या गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गौतमी एका तरूणाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्या तरूणाने गौतमीची छेड काढल्यानं ती संतापली होती, अशी माहिती मिळाली आहे.
हा व्हिडीओ आत्ताचा नसून तो दोन-तीन महिने जुना आहे, असं म्हणलं जात आहे. हा व्हिडीओ रविंद्र देशमुख या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. परंतु सध्या या व्हायरल व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे.
दरम्यान, गौतमीच्या लावणीत अश्लीलता आहे, असं म्हणत काही लावणी कलावंत आणि संघटना गौतमीच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
परंतु तिच्या लावणीवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना गौतमी म्हणाली आहे की, विरोध करणाऱ्यांनी सध्या होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये कुठं अश्लीलता दिसत आहे, हे दाखवून द्यावे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘माझ्या विषयावरून जनतेला भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय’, उर्फीचं चित्रा वाघ यांना चोख प्रत्युत्तर
- ‘नंगटपणा करणाऱ्या या बाईला बेड्या ठोका’, चित्रा वाघ उर्फीवर भडकल्या
- आता कियारा-सिद्धार्थचंही ठरलं; ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ
- मनसे- भाजप युतीसमोर शिक्कामोर्तब?, भाजपच्या बड्या नेत्यानं घेतली राज ठाकरेंची भेट
- “छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच”