अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर गौतमीचं प्रत्युत्तर म्हणाली “दादा…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गौतमी पाटील (Gautami Patil) लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप काहीजणांकडून करण्यात येत होता. याचसंबधी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आपली भूमिका मांडली होती. पक्षातील कोणत्याही नेत्यांनं गौतमी पाटीलच्या डान्सचं आयोजन करु नये अशी सूचना देण्यात आली होती.

याचसंबधी गौतमीला विचारलं गेलं असता, दादा खूप मोठे आहेत. मी दादांना काही बोलू शकत नाही. मी चुकले होते तर मी माफी मागितली आहे. सुधारणा देखील केली आहे. त्यानंतरदेखील मला ट्रोल केलं जात आहे. अजूनदेखील माझे जुने व्हिडिओ टाकले जात आहेत. हे कोण करत आहे हे मला माहित नाही. काहींना माझी प्रसिद्धी(publicity) पाहवत नाही. असं उत्तर गौतमीनं दिल आहे

लोक माझी वाईट बाजू दाखवत आहेत. मी आता साडी नीट घालत आहे. घुंगरु बांधत आहे हे दिसत नाही का? असा सवाल देखील गौतमीनं केला आहे. कार्यक्रमाला नेहमीच गर्दी असण्याचं कारण काय? असं विचारलं असता प्रेक्षकांच्या (Audience) प्रेमामुळे आणि माझ्या आतापर्यंतच्या मेहनतीमुळे कार्यक्रमाला गर्दी होते, असं उत्तर गौतमीनं दिलं.

यावेळी बोलताना ट्रोलर्सना (trollers) गौतमीनं आवाहन केलं आहे. तुमचा माझ्यावर काही वैयक्तिक राग असेल तर तो असा काढू नका. माझे जुने व्हिडीओ टाकू नका. मी पुन्हा एकदा माझ्या काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागते. मागच्या गोष्टी आता पुढे आणू नका. चांगल दाखवा,असंही ती पुढे म्हणाली.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी राष्ट्रवादी चित्रपट, कला आणि सांस्कृतिक विभागाची बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावरुन काहींनी अजित पवारांकडे (Ajit Pawar) तक्रार केली. त्यावेळी पवारांनी यासंबधी सूचना दिल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या