महाराष्ट्र मुंबई

मी रहाणेच्या कर्णधारपदावर बोलणार नाही, कारण…- सुनिल गावसकर

 मुंबई | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कर्णधार आहे, पण भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वावर बोलण्यास नकार दिला.

टॉस हरल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय टीमने रहाणेच्या नेतृत्वात उल्लेखनीय कामगिरी केली. रहाणेने मॅचच्या 10व्या ओव्हरमध्येच अश्विनला बॉलिंग दिली, ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. यानंतर अश्विनने मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथला आऊट केलं. अश्विनने पहिल्या इनिंगमध्ये 38 रन देऊन 3 विकेट घेतल्या.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचं सगळ्यांकडूनच कौतुक होत असताना सुनिल गावसकर यांनी मात्र याबाबत बोलायला नकार दिला.

मी रहाणेच्या कर्णधारपदावर बोलणार नाही, कारण मी मुंबईच्या मुलांचं समर्थन करतो, अशी टीका माझ्यावर होईल. पण भारतीय टीमच्या कामगिरीवर मी आनंदी आहे,अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.

थोडक्यात बातम्या

‘…तर देशातील राज्यं फुटतील’; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

“सरकारकडे विकासासाठी पैसा नाही पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहे”

मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट!

…तर त्यांना 10 फूट खोल खड्यात पुरलं जाईल- शिवराज सिंह चौहान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या