पुण्यातील त्या पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या हत्येमागचं गूढ उकललं; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर
पुणे | कौटुंबिक संबंधातून अनेक वाद होत असतात. त्यामुळे नात्यात देखील दुरावा निर्माण होतो. तर मैत्रीमध्ये देखील भांडण किंवा वाद होत असतात. पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची गुत्ती सोडवण्यास चतुःशृंगी पोलिसांना यश आलं आहे.
पुण्यातील चतुःशृंगी भागात राहणारा हा विद्यार्थी पीएचडी पाषान येथील नॅशनल केमीकल लाॅबोरेटरी मध्ये काम करत होता. सुदर्शन पंडीत असं या खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. रविराज क्षिरसागर आणि सुदर्शन पंडीत या दोघांमध्ये समलैगिंक संबंध होते. एक दिवस त्या दोघांंमध्ये वाद झाला होता.
वाद शिगेला पोहचला आणि त्याच रागातून रविराज क्षिरसागरने सुदर्शन पंडीतची हत्या केली. सुदर्शनची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर देखील त्याचा दगडाने ठेचून चेहरा बिघडवण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी असा प्रकार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यानंतर सुदर्शनचा मृतदेह सुस येथील खिंडीत टाकण्यात आला होता.
दरम्यान, सुदर्शनच्या चुलत भाऊ संदीप पंडीतने त्यानंतर पोलिसांकडे गुन्हा नोंदवला होता. फर्यादीवरून चतुःशृंगी पोलिसांनी तपास चालू केला. त्यानंतर पोलिसांना या हत्तेचं गुढं सोडवण्यात यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविराज क्षिरसागरला अटक केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“मोदींना आणि योगींना मुलं नाहीत ते काय कुणाला देऊन जातील”
मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या मुलाला झाली कोरोनाची लागण
अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळत नाही- पंकजा मुंडे
सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी
“हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली”
Comments are closed.