बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गायत्री मंत्राने कोरोना पळवणार?; मोदी सरकारचा नवा प्रयोग

नवी दिल्ली | ऋषिकेशमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये सध्या एक संशोधन करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांवर सामान्य उपचारांव्यतिरिक्त गायत्री मंत्राचा जप आणि प्राणायम केल्यानं काही सकारात्मक प्रभाव पडतो का?, याबाबत सध्या संशोधन सुरु आहे. या संशोधनासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाकडून 3 लाखांचा निधी देण्यात आला आहे.

गायत्री मंत्राच्या संशोधनासाठी 20 रुग्णांवर अभ्यास केला जात आहे. 14 दिवसांपर्यंत चालणाऱ्या या चाचणीमध्ये रुग्णांच्या शरिरामध्ये होणाऱ्या बदलांची तपासणी केली जाणार आहे. या प्रयोगासाठी म्हणून क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यासाठीची अधिकृत नोंदणीसुद्धा आयसीएमकडे करण्यात आली आहे.

20 रुग्णांना दोन गटांमध्ये विभागलं गेलं आहे. पहिल्या गटातील लोक सामान्य उपचारांसह सकाळी आणि संध्याकाळी प्राणायमाशिवाय गायत्री मंत्राचंही पठण करणार आहेत. तर दुसऱ्या समूहातील लोकांना कोरोनातून वाचण्यासाठी फक्त सामान्य उपचार दिले जात आहेत. या दोन्ही समूहातील रुग्णांच्या शरीरातील बदलांसाठी 14 दिवसांपर्यंत अभ्यास केला जाईल, आणि त्यावर निष्कर्ष काढले जाणार आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूवरच्या विविध उपचार पद्धती विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोगिक अभ्यासांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर या प्रयोगाला मान्यता देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता गोमूत्र प्या, तुम्हाला कोरोना होणार नाही”

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन; फक्त या सेवा सुरू राहतील

“नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्यामागची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या”

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनाने वडिलांचं निधन; अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर कुटुंबाने उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More