बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हळू रे हळू! गेलने सिक्स मारत फोडली गॅलरीची काच, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

मुंबई | क्रिकेटच्या मैदानात स्टेडियमचे पत्रे फोडणाऱ्या ख्रिस गेलची ‘युनिव्हर्सल बाॅस’ अशी जगभरात ओळख आहे. उभ्या उभ्या चेंडू स्टेडियमबाहेर पाठवणारा ख्रिस गेल आता कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये गोलंदाजांची धूलाई करताना दिसत आहे. याच कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील ख्रिस गेलचा एक नविन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स या संघाचं ख्रिस गेल प्रतिनिधित्व करत आहे. वॉर्नर पार्कमध्ये झालेल्या सामन्यात ख्रिस गेल 1 गडी बाद झाल्यानंतर खेळायला उतरला. सुरूवातीपासून त्यानं आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु,  त्याला जेसन होल्डरने शांत ठेवलं. त्यानंतर पाचव्या षटकाचा पाचवा चेंडू होल्टरने गेलला सरळ टाकला.

होल्डरच्या या सरळ चेंडूला गेलने बॉलरच्या डोक्यावरून मारला. त्यामुळे चेंडू थेट खिडकीला जाऊन धडकला. गेलच्या षटकारामुळे खिडकीची काचच फुटली. त्याच्या या फटक्यामुळे साईड स्क्रीनवरील गॅलरीची काचेची खिडकी तुटली. या सामन्यात गेल काही खास कामगिरी करू शकला नाही. तो लगेचच 12 धावा करून बाद झाला. मात्र, त्याच्या षटकाराची चर्चा मात्र आता सर्वत्र होताना दिसत आहे.

दरम्यान, याआधीही ख्रिस गेलने काचा फोडण्याची कामगिरी केली होती. फास्टरला देखील उभ्या उभ्या षटकार खेचण्याची ताकद ख्रिस गेल ठेवतो. आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या देखील ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने पुणे वाॅरियर्स विरूद्ध 175 धावांची मोठी खेळी केली होती.

पाहा व्हिडीओ-

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by CPL T20 (@cplt20)

थोडक्यात बातम्या-

“जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे, मी एकटा काय करू?”

अबब! थेट कारवरच उतरलं विमान… बघा नेमका काय घडला प्रकार

“आम्ही अस्वल… आमच्यावर खूप केस आहेत, दहीहंडी करणारच”

“मुख्यमंत्री आणि संजय राऊतांनी शरद पवारांची शिकवणी लावावी”

“शिवसेना-भाजपच्या भांडणात…”; प्रताप सरनाईक यांचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More