Top News सातारा

असाध्य आजाराशी झुंज देतेय चिमुकली; तुमच्या आर्थिक मदतीची गरज!

सातारा | साताऱ्यात राहणाऱ्या प्रणिता शेगडे. प्रणिता यांच्यासह एकूण 3 बहिणी शेगडे कुटुंबात होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झालं. या धक्क्यातून सावरत असताना अजून एक धक्का बसला तो म्हणजे गेल्या वर्षी प्रणिता यांच्या लहान बहिणीचंही निधन झालं. अशाच कठीण परिस्थितीत अजून एक दुःखाचा डोंगर कोसळावा तसंच प्रणिता यांच्या लहान बहिणीला जीबी सिंड्रोमने ग्रासलं.

प्रणिता यांची लहान बहिण अनघा शेडगे सध्या रूग्णालयात उपचार घेत आहे. साताऱ्यातील प्रतिभा रूग्णालयात अनघावर उपचार सुरु आहेत. मात्र उपचारांचा खर्च परवडण्याजोगा नसल्याने त्यांनी क्राऊड फंडींगचा मार्ग स्विकारणात आलंय. त्यानुसार सोनाली शिंदे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून क्राऊड फंडींगला सुरुवात केली आहे.

सोनाली शिंदे यांच्या सांगण्यानुसार, आई आणि बहिणीच्या जाण्याने शेगडे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. त्याप्रमाणे घराची आर्थिक परिस्थितीत देखील हलाखीची आहे. त्यात लहान बहिणीली जीबी सिंड्रोम झाला असून यामध्ये दोन्ही पाय आणि एक हात काम करत नसल्याने रूग्णालयात दाखल केलं आहे. याच्या उपचारांसाठी पैशांची फार गरज आहे.

अनघासाठी रूग्णालयाचा दर दिवसाचा खर्च 20,000 ते 25000 खर्च आहे. हे उपचार किमान एक ते दीड महिना सुरू ठेवावे लागणार आहेत. शेडगे कुटुंबिय हा इतका मोठा खर्चाचा भार पेलवू शकत नाहीत. त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक मदत करून समाजातील दानशूर व्यक्तींनी या चिमुकलीला मदत करावी असं आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात आलंय.

ज्या दानशूर मंडळींना या चिमुकलीच्या उपचारसाठी मदत द्यायची आहे त्यांनी गुगल पे द्वारे किंवा बॅक ऑफ महाराष्ट्राच्या दिलेल्या खाते नंबरवर पैसे भरून मदत करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

Google pay :
Pranita Shedage
7249753845
Sonali shinde 9767320064
Bank of Maharashtra
Name-pranita pralhad shedage
A/c no – 60220127611
IFSC code – MAHB0001836

महत्त्वाच्या बातम्या-

…तेव्हा फडणवीसांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?- अशोक चव्हाण

महाराष्ट्राला प्रगतीपथावर अग्रेसर ठेवण्यासाठी वचनबद्ध, मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार

बारामतीकरांनो… कोरोना वाढतोय पण ‘या’ आकडेवारीनं नक्कीच दिलासा मिळेल

“कॅन्सरवर मात केल्यानंतर मला कमबॅक करण्यासाठी सचिनचा ‘तो’ सल्ला मोलाचा ठरला”

धक्कादायक! पुण्यात घडलं असं काही की डाॅक्टरही झालेत हैराण, कोरोनाचा अजब प्रकार…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या