Loading...

सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी; मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

सांगली |  सांगली आणि कोल्हापूरच्या पुरग्रस्तांसाठी संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ अविरत सुरू आहे. मात्र हीच मदत भाजप नगरसेविका गीता सुतार यांच्या डोळ्यात खुपत आहे. गीता सुतार यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील  पूरग्रस्त निवारा केंद्र बंद पाडले आहे.

मराठा सेवा संघाच्या वतीने गेल्या 9 दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी छावणी सुरू आहे. आज या ठिकाणी भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या गुंडांनी येऊन मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे

Loading...

गुंडांच्या मारहाणीत एका महिला पत्रकारालाही धक्काबुक्की झाली आहे. या नगरसेविकाने या मदत छावणीमध्ये काही मिळत नाही, असं सांगण्याचा दबाव लोकांवर टाकत होती. पण लोकांनी याला नकार दिला.

दरम्यान, भाजपच्या नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त निवारा केंद्रातील मदतीचे सामानही घेऊन गेल्याचा दावा मराठा सेवा संघांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील शिक्रापूरमध्ये महिलेचा विनयभंग, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

-लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला- संभाजी भिडे

-आमदार महेश लांडगेंच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

Loading...

-राज्यासाठी 6800 कोटी रूपयांची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार- मुख्यमंत्री फडणवीस

-मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राष्ट्रवादीकडून 50 लाखांची मदत

Loading...