बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्हाला दोनवेळा निवडून दिलंय, आम्हाला जनतेची काळजी आहे”

नवी दिल्ली | काही दिवसांपुर्वी ऑक्सिजनचा पुरवठा करताना योग्य पद्धतीनं नियोजन केलं जात नसल्याचा आरोप दिल्ली सरकारने केला होता. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमुर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमुर्ती एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.

देशातील जनतेनं दोनवेळा आम्हाला निवडून दिलं आहे. आम्हाला जनतेची आणि त्यांना होणाऱ्या त्रासाची चिंता आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी आम्ही राजकीय स्तरावरही प्रयत्न करत असून मित्र देशांकडून ऑक्सिजनची आयातही केली जात आहे, असं सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं आहे. तसेच दिल्ली सरकारकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देऊ इच्छित नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

आम्हाला देशभरातील सर्वच ठिकाणांहून होणाऱ्या मागणीचा विचार करावा लागतो.  सध्या सरकारचा ऑक्सिजन पुरवठा करण्याचं सुत्र हे कायमस्वरुपी ठरलं नसून त्यात गरजेनुसार बदल करण्यात येतो. अनेक तज्ज्ञांची मदत घेऊन आकडेवारीच्या आधारे ऑक्सिजनचा पुरवठा कसा केला जावा याचं नियोजन केंद्र सरकारने केलं आहे, असंही त्यानी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, आम्हाला फक्त दिल्लीतील लोकांची चिंता नसून देशातील सर्व जनतेची काळजी आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिनचा पुरवठा आणि मागणी याचं ऑडिट व्हावं अशी मागणी कधीही करण्यात आलेली नाही. मात्र दिल्ली सरकारकडून तसे दावे केले जात आहे, असंही मेहता यांनी न्यायालयात स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ शहराची कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल सुरू; रूग्णसंख्येत तब्बल 8 हजारांची घट

चिंता वाढली! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ

महाआघाडीतील नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल

‘मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत,समोरून वार करतात’; आमदार शशिकांत शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया

पुण्यात आज अजित पवारांची आढावा बैठक; कडक लॉकडाऊनवर निर्णय होण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More