पुणे महाराष्ट्र

लॉकडाऊनमुळे पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोर

पुणे | पुण्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसलेला इस्टेट एजंट थेट सोनसाखळी चोर बनल्याचं पाहायला मिळालं आहे. या इस्टेट एजंटने सोनसाखळी चोरली, मात्र पोलिसांनी सोनसाखळीसह या चोराच्या एका तासातच पकडलं आहे. या कारवाईत 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इस्टेट एजंटचा सोनसाखळी चोर झालेल्या या व्यक्तीचं नाव मोहम्मद अतिफ इक्बाल शेख असं आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सोनसाखळी चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानं पोलिसांनी तात्काळ या भामट्याला शोधून काढलं. 26 वर्षीय मोहम्मद हा उंड्री परिसरात फिनिक्स वृंदावन या सोसायटीत राहतो.

दरम्यान, नाना पेठेतील टक्कार गल्लीत तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होता. मात्र लॉकडाऊनची झळ बसल्याने तो सोनसाखळी चोरी करत होता.

ट्रेंडिंग बातम्या-

“गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना आजही धोका आहे”

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याच्या अंदाज

शेतकऱ्यांसाठी सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा, जुलैअखेरपर्यंत….

जन्माला आला तो मरणारच, एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला…- उदयनराजे भोसले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या