अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनियर जॉर्ज बुश यांचं निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनियर जॉर्ज बुश यांचं निधन

वॉशिंग्टन | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनियर जॉर्ज बुश यांचं वृद्धापकाळामुळे निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. 

अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आणि माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ही माहिती दिली.

12 जून 1924 रोजी त्यांचा जन्म झाला होता. जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश असं पूर्ण नाव असलेल्या त्यांनी 1989 पासून 1993 पर्यंत अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद साभाळलं.

ते अमेरिकेचे 41 वे राष्ट्राध्यक्ष होते. त्याआधी ते 1981 ते 1989 पर्यंत उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ काय आहे या होर्डिंग्सचा अर्थ?

-मराठा आरक्षण विधेयकाला आव्हान; सोमवारी याचिका दाखल होणार?

-धनगर समाजानं घेतली शपथ; या एका शपथेमुळं ‘भाजप’ची डोकेदुखी वाढली!

-आता सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त 5 दिवस काम!

-पाकिस्तान सीमेवर वाढत आहे मुस्लिमांची लोकसंख्या-BSF

Google+ Linkedin