बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चीनने खरं काय ते सांगितल्यास…’; जर्मनीची चीनला विनंती

बर्लिन | जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी चीनकडे एक विनंती केली. कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात चीनने स्पष्टपणे माहिती द्यावी, असं मार्केल यांनी म्हटलं आहे.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटनपाठोपाठ जर्मनीसारख्या बड्या देशाने अशी मागणी केल्याने कोरोनाचा संसर्ग मानवामध्ये कसा झाला यासंदर्भात माहिती उघड करण्याचा चीनवरील दबाव वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.

चीनने या विषाणूचा प्रसार कसा आणि कधी सुरु झाला याबद्दल अधिक चांगल्याप्रकारे आणि स्पष्टपणे सांगितल्यास त्याचा सर्वांना फायदा होईल असं मला वाटतं. तसेच यामधून सर्वांना धडा घेता येईल, असं मार्केल यांनी बर्लिनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ य़ांनीही या विषाणूची निर्मिती कशी झाली यासंदर्भात अमेरिकेकडून चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“पालघरवरून कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र रंगवलं जातंय पण आरोपींना 24 तासांच्या आत गजाआड केलंय”

“यांना साधू गेल्याचं दु:ख नाही तर त्यानंतर पेटवापेटवी अपयशी ठरली याचं वाईट वाटतंय”

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत यांची काल राज्यपालांच्या कारभारावर टीका; आज देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला

संकट आहे म्हणून नकारात्मक विचार नको, आपण विजयी होणार आहोत; पवारांचा फेसबुकद्वारे संवाद

रमजानमध्ये घरातच नमाज पठन करा; शरद पवार यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More