Good Night Sleep l दिवसभराच्या धावपळीनंतर (Hectic Life) प्रत्येकजण रात्री शांत झोप (Peaceful Sleep) घेऊ इच्छितो. परंतु, अनेकदा रात्री अचानक जाग येते (Sudden Awakening), ज्यामुळे पूर्ण दिवस आळसात (Laziness) जातो. किंवा काहीवेळा तर रात्रभर झोपच येत नाही. रात्री झोप न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात जी तुमच्या शारीरिक (Physical) आणि मानसिक आरोग्यासाठी (Mental Health) पुढे जाऊन एक मोठी समस्या (Problem) निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय (Remedy) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला रात्री सहजपणे झोप लागेल.
या बातमीच्या माध्यमातून आपण रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या प्रकारचा व्यायाम (Exercise) करावा आणि त्यामुळे शांत झोप लागण्यास कशी मदत होते याबद्दल जाणून घेणार आहोत.
झोपण्यापूर्वी ‘हा’ व्यायाम करा :
लोक अनेकदा रात्री चांगली झोप येण्यासाठी अनेक पद्धतींचा (Methods) वापर करतात जसे की ध्यानधारणा (Meditation), कोमट पाण्याने (Lukewarm Water) अंघोळ करणे इत्यादी. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की रात्री झोपण्यापूर्वी हातांचा व्यायाम (Arm Exercise) केल्याने देखील चांगली झोप येऊ शकते? चला तर मग, काही आरोग्य तज्ज्ञांकडून (Health Experts) जाणून घेऊया की रात्री झोपण्यापूर्वी हातांचा व्यायाम केल्याने कशी शांत झोप लागते.
Good Night Sleep l तज्ज्ञ काय सांगतात? :
जेम्स मूरे (James Moore) सांगतात की, “रात्री हातांचा व्यायाम केल्याने शांत झोप लागण्यास मदत होते. हा व्यायाम झोपण्याच्या वेळेच्या (Bedtime) अगदी 10 मिनिटे आधी केला पाहिजे. या ट्रिकमुळे (Trick) शरीर (Body) पूर्णपणे रिलॅक्स (Relax) होते आणि रक्तदाबाचा (Blood Pressure) समतोल (Balance) देखील योग्य राहतो आणि झोपही चांगली येते.”
व्यायाम कसा करावा? :
पुढे बोलताना मूरे सांगतात की, “हा व्यायाम करण्यासाठी सरळ उभे राहून शरीर पूर्णपणे रिलॅक्स सोडावे, नंतर हळूहळू आपले हात (Hands) उजवीकडून डावीकडे (Right to Left) गोलाकार फिरवावेत (Rotate).” हा व्यायाम पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टमला (Parasympathetic Nervous System) सक्रिय (Activate) करण्यास मदत करतो, ज्यामुळे चांगली झोप येते.
हातांचा व्यायाम हा झोपण्यापूर्वी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी (Effective) मार्ग आहे. हा व्यायाम नियमितपणे (Regularly) केल्यास तुम्हाला रात्री शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होईल.