आधार कार्डवर मिळणार ‘इतक्या’ हजारांचं कर्ज; जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ योजना

Get Aadhar Card Loan Up To 80000 Without Collateral Know PM SVANidhi Scheme

Aadhar Card Loan | तुम्हीही कधी ना कधी बँकेकडून कर्ज (Aadhar Card Loan) घेतले असेल किंवा कर्ज घेण्याच्या तयारीत असाल? तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे. खरेतर, अलीकडे बँकांच्या माध्यमातून विविध गोष्टींसाठी कर्ज दिले जात आहे. अगदी स्मार्टफोन (Smartphone) खरेदीसाठी देखील कर्ज मिळते. याशिवाय कार घेण्यासाठी, घर घेण्यासाठी किंवा आपल्या वैयक्तिक गरजा (Personal Needs) पूर्ण करण्यासाठी देखील बँकेकडून कर्ज दिले जाते.

मात्र बँकेकडून किंवा वित्तीय संस्थांकडून (Financial Institutions) कर्ज देताना कर्जदारांकडून विविध प्रकारची कागदपत्रे (Documents) मागवली जातात. कर्ज घेताना कर्जदारांना मोठा आटापिटा करावा लागतो. कर्जासाठी विविध प्रकारच्या कागदपत्रांची जमवाजमव करून अनेकदा बँकेमध्ये जावे लागते.

मात्र केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) अशी एक योजना (Scheme) राबवली जात आहे ज्याच्या माध्यमातून फक्त आधार कार्डवर (Aadhar Card) नागरिकांना कर्ज मिळत आहे. या योजनेतून नागरिकांना 80 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते आणि विशेष म्हणजे यासाठी नागरिकांना तारण (Collateral) द्यावे लागत नाही. अर्थातच या अंतर्गत मिळणारे कर्ज हे विनातारण (Unsecured Loan) म्हणजेच विना गॅरंटी (Without Guarantee) असते. यामुळे ही योजना संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाली आहे. या योजनेला पीएम स्वानिधी योजना (PM SVANidhi Yojana) असे नाव देण्यात आले असून ही योजना सरकारने कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात सुरू केली होती. (Aadhar Card Loan)

या अंतर्गत ही योजना विशेषत: रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी (Street Vendors) म्हणजेच फेरीवाल्यांसाठी (Hawkers) सुरू केली गेली होती, ज्यांचे रोजगार कोरोना साथीच्या उद्रेकादरम्यान पूर्णपणे नष्ट झाले होते. परंतु या योजनेची लोकप्रियता लक्षात घेता सरकारने नंतर याची व्याप्ती वाढविली. आता या योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना (Small Businesses) कर्जपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेचे स्वरूप थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहे पीएम स्वानिधी योजनेचे स्वरूप?

जर आपण पंतप्रधान स्वानिधी योजनेचे तपशील पाहिले तर या अंतर्गत कर्जदारांना 80,000 रुपयांचे कर्ज एकरकमी दिले जात नाही. तर हे कर्ज टप्प्याटप्प्याने (In Installments) दिले जाते. या अंतर्गत कर्जदारांना एकूण तीन टप्प्यांमध्ये कर्ज मिळते. या सरकारी योजनेंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी आपल्याला आपली विश्वासार्हता (Credibility) सिद्ध करावी लागेल आणि या आधारावर आपण पुढील कर्ज घेण्यास सक्षम व्हाल. यामध्ये आपल्याला सुरुवातीला दहा हजार रुपयांचे कर्ज मिळेल. मग 20,000 चे आणि नंतर 50,000 चे कर्ज मिळणार आहे.

या योजनेतून प्रथम 10,000 रुपयांचे कर्ज उपलब्ध होईल, ही रक्कम वेळेवर भरल्यानंतर, ती व्यक्ती दुसऱ्या वेळी अर्ज करून या योजनेअंतर्गत 20,000 रुपयांचे कर्ज सहजपणे घेऊ शकते. त्याचप्रमाणे, ही रक्कम परतफेड केल्यानंतर, तिसऱ्यांदा ती व्यक्ती 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र ठरेल आणि ही रक्कम सरकारकडून दिली जाईल, जी तो आपला व्यवसाय (Business) वाढविण्यासाठी वापरू शकतो. (Aadhar Card Loan)

फक्त आधार कार्डच्या माध्यमातून मिळणार कर्ज

या योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देते. पंतप्रधान स्वानिधी योजना अंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत करावी लागते. यासाठी कर्जदारांकडून व्याजही (Interest) वसूल केले जाते. फारच कमी व्याजदरात याअंतर्गत कर्ज मिळते. दरमहा ईएमआयच्या (EMI) माध्यमातून समान हप्त्यांमध्ये कर्जाची रक्कम परतफेड करण्याची सुविधा देखील मिळते.

तसेच याचा फायदा घेण्यासाठी अर्जदाराकडे फक्त आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पंतप्रधान स्वानिधी योजना अंतर्गत कोणत्याही सरकारी बँकेत (Government Bank) अर्ज केला जाऊ शकतो. अर्ज मंजुरीनंतर (Approval) लगेचच कर्जाची रक्कम आपल्या खात्यात हस्तांतरित (Transfer) केली जाते. या योजनेच्या व्याजावर सरकारकडून सबसिडी (Subsidy) सुद्धा दिली जाते. (Aadhar Card Loan)

थोडक्यात, पीएम स्वानिधी योजना ही एक उत्तम योजना असून, रस्त्यावरील विक्रेते आणि छोट्या व्यावसायिकांना फक्त आधार कार्डच्या आधारे विनातारण कर्ज मिळवून देते. या योजनेचा लाभ घेऊन गरजू व्यक्ती आपला व्यवसाय सुरू करू शकतात किंवा वाढवू शकतात.

Title: Get Aadhar Card Loan Up To 80000 Without Collateral Know PM SVANidhi Scheme

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .