Top News देश

“आपल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज आहे, लाठ्या-काठ्या, अश्रुधुराच्या माऱ्याने ते फिटणार नाही”

नवी दिल्ली | गेले 6 दिवस देशभरातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर जमा झाले आहेत. मात्र केंद्र सरकारने त्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अहंकाराची खुर्ची सोडून खाली उतरावे आणि शेतकऱ्यांना त्यांचे हक्क प्रदान करावेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला धारेवर धरलं आहे आहे.

“हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत आणि ‘खोटे’ दूरदर्शनवर भाषणे देत आहेत. अन्नदाता शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कर्ज आपल्या डोक्यावर आहे”, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना न्याय दिल्यानंच या कर्जातून उतराई होता येईल, त्यांना दूर लोटून, लाठ्या-काठ्या आणि अश्रुधुराचा मारा करून हे कर्ज फिटणार नसल्याचंही राहुल गांधी म्हटलं आहेत.


महत्वाच्या बातम्या-

फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येणार!

सुप्रिया सुळेंनी उडवली नारायण राणेंची खिल्ली; म्हणाल्या…

“चुरस आहे पण विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू, पुणे तर वनवेच”

लव्ह जिहाद व जबरदस्तीने धर्मांतर कायद्याबाबत पुनर्विचार करा- मायावती

“मला सत्ता हा विषय गौण असून भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली हे जाहीर कराच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या