बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 10 वर्षात 16 लाख मिळवा!

नवी दिल्ली | आपण कमावलेला पैसा हा आपल्या चांगल्या कामासाठी वापरात यावा असं आपल्याला वाटतं. पैसा गुंतवणूक करताना आपण सुरक्षित पर्यायाचा विचार करत असतो. सुरक्षित गुंतवणूक करून मोबदला मिळावा अस आपल्याला वाटत असतं. पैसा गुंतवताना पोस्ट ऑफिसच्या योजनांचा आपण पहिल्यांदा विचार करतो.

पोस्ट ऑफिस नेहमीच आकर्षक योजनांच्या माध्यमातून आपल्याला गुंतवणूकीचे पर्याय देते. रिकरिंग डिपाॅझीट म्हणजे गुंतवणूकीचा आकर्षक आणि चांगला पर्याय आहे. आरडीमध्ये आपला पैसा सुरक्षित रहातो. आरडीच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळणार आहे.

आरडी ही योजना पोस्टाच्या सर्वात गाजलेल्या योजनांपैकी एक आहे. दरमहिन्याला तुम्ही 100 रूपये सुद्धा आरडी भरू शकता. आरडी ही फक्त 5 वर्षांसाठी असते. 1 एप्रिल 2020 पासून आरडीवर 5.8 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. केंद्र सरकारनं छोट्या बचत योजनांसाठी दर तीन महिन्यांना व्याज  ठरवण्याचं धोरण आखलं आहे. याचा फायदा गुंतवणूकदाराला होत आहे.

आरडी या योजनेचा फायदा होत असल्याचं पहायला मिळत आहे. एखाद्यानं दरमहा 10 हजार रूपयाची आरडी काढली. त्या रकमेवर 5.8 टक्के व्याजदर मिळतं. या व्याजदरानं तुम्ही 10 वर्ष ही रक्कम भरली तर तुम्हाला 16 लाख रूपये मिळणार आहेत.

थोडक्यात बातम्या 

“महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका”

नरेंद्र मोदी 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर; मोदींंचं अमेरिकेत जंगी स्वागत

मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले माहित नाही, पण… – उदयनराजे भोसले

मोठी बातमी! एमपीएससी आयोगाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

शिवसेनेशी पंगा नंतर फोन, आता थेट भेट; अमित शहा आणि राणेंमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More