निवृत्तीनंतर मिळवा महिन्याला 1 लाख पेन्शन आणि व्हा कोट्याधीश; जाणून घ्या सरकारी योजना

get monthly pension of 1 lakh in national pension scheme

National Pension Scheme | सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नसल्याने अनेकांना भविष्याची चिंता सतावत असते. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. एका सरकारी योजनेच्या माध्यमातून तुम्ही निवृत्तीनंतर केवळ पेन्शनच नाही तर कोट्याधीश देखील होऊ शकता. (National Pension Scheme)

ही योजना म्हणजे दुसरी तिसरी कोणती नसून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme – NPS) आहे. या योजनेत योग्य आर्थिक नियोजन (Financial Planning) करून गुंतवणूक केल्यास महिन्याला १ लाख रुपये पेन्शन सहज मिळवता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) म्हणजे काय?

एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक निवृत्ती योजना आहे. यामध्ये कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो. ही योजना शेअर बाजाराशी (Share Market) संलग्न असून, गुंतवलेले पैसे शेअर बाजारातील विविध शेअर्समध्ये गुंतवले जातात. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेअर बाजाराशी निगडित असल्याने या योजनेत थोडीफार जोखीम असते. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) केल्यास हा धोका नगण्य ठरतो. (National Pension Scheme)

या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी किंवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून एनपीएस खाते उघडता येते. निवृत्तीनंतर एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम एकरकमी काढता येते, तर उर्वरित ४० टक्के रक्कम पेन्शन योजनेत गुंतवली जाते आणि त्यातून मासिक पेन्शन दिली जाते. जर एकूण जमा झालेली रक्कम ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर संपूर्ण रक्कम एकरकमी काढता येते. विशेष म्हणजे ही संपूर्ण बचत करमुक्त (Tax Free) असते.

महिन्याला १ लाख पेन्शन मिळवण्याचे गणित

एनपीएस योजनेतून महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, पुढील २० वर्षांसाठी दरमहा २० हजार रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दरवर्षी ही रक्कम १० टक्क्यांनी वाढवत नेणे गरजेचे आहे. जर गुंतवणुकीवर सरासरी १० टक्के परतावा गृहीत धरला, तर २० वर्षांनंतर एकूण गुंतवणूक सुमारे ३ कोटी २३ लाख रुपये इतकी होईल. (National Pension Scheme)

यापैकी ६० टक्के रक्कम म्हणजेच सुमारे १.८५ कोटी रुपये एकरकमी मिळतील. तर उर्वरित ४० टक्के रक्कम म्हणजेच सुमारे १.३७ कोटी रुपये पेन्शन योजनेत गुंतवले जातील. या रकमेतून दरमहा १ लाख रुपये पेन्शन सहजपणे मिळू शकते.

Title: get monthly pension of 1 lakh in national pension scheme

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .