बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राम मंदिरासाठी पैसे न दिल्यास धर्मातून बाहेर काढू; नाना पटोलेंना धमकी

मुंबई | राम मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशभरातून निधी जमा करण्यात येत आहे. काही लोक आपल्याकडे निधी मागण्यासाठी आले होते. त्यांनी पैसे न दिल्यास धर्मातून बाहेर काढू असा आरोप क्राॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याचे काम सुरु आहे. मंदिर उभारणीसाठी निधी संकलन केले जात आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेकांनी यासाठी निधी दिला आहे. मंदिर उभारण्यासाठी अनेकांनी चांदीच्या वाट्याही दिल्या आहेत. निधी संकलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निधी संकलनावर काॅंग्रेससह अनेक काही विरोधी पक्षांनी टीकाही केली आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यादरम्यान टीका केली आहे. भगवान श्री रामाच्या नावाने निधी मागण्यासाठी काही लोक माझ्याकडे आले होते. मी त्यांना विचारले की, 30 वर्षांपूर्वी तुम्ही राम मंदीरासाठी पैसे घेऊन गेले होते, ते पैसे कुठे आहेत? त्यानंतर ते म्हणाले की, जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुम्हाला धर्मातून बाहेर काढू, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, पटोले यांनी आज विधासभेत राम मंदिरासाठी सुरु असलेल्या निधी संकलनावर प्रश्न उपस्थित केला. श्री रामाच्या नावाखाली देणग्या गोळा करण्याचा ठेका भाजपने घेतला आहे का? ही टोलवसूली सुरु आहे. हा अधिकार भाजपला कुणी दिला आहे? निधी न दिल्यास त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.

थोडक्यात बातम्या –

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच, लायसन्सची गरज नाही… किंमत फक्त…

वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर

“भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More