Farmer News l शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा मिळावी यासाठी सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित दरात सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातील. अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. मग या योजनेचे फायदे, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष काय आहेत? जाणून घेऊया.
योजनेबद्दल संपूर्ण माहिती :
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त दरात सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप मिळतील. त्यामुळे विजेच्या भारनियमनाच्या समस्येशी सामना करण्याची गरज भासणार नाही. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होईल. तसेच, डिझेल पंपांवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाचीही बचत होईल.
Farmer News l योजनेसाठी पात्रता कोणती? :
– सिंचनासाठी पाणी स्रोत असणे आवश्यक – शेततळे, विहीर, बोअरवेल किंवा बारमाही वाहणाऱ्या नदी/नाल्याच्या शेजारील शेतकरी पात्र ठरतील.
– महावितरणकडून पडताळणी – पाणी स्रोत शाश्वत असल्याचे महावितरणकडून तपासले जाईल.
– पूर्वी अन्य सौर कृषी पंप योजना घेतली नसावी – अटल सौर कृषी पंप योजना 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी अर्ज करू शकणार नाहीत.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
– ७/१२ उतारा (पाण्याचा स्रोत नमूद असणे आवश्यक)
– मालकी हक्क दर्शविणारा ना हरकत दाखला
– आधार कार्ड
– बँक पासबुक
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती-जमाती किंवा इतर मागास प्रवर्गासाठी)
– डार्क झोन प्रमाणपत्र (जर पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असेल)
– ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
News Title: Get Solar Pumps for Your Farm with Government Subsidy