बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एसटी विलिनीकरण डोक्यातून काढून टाका’ अजित पवारांचा कर्मचाऱ्यांना इशारा

मुंबई | एसटी विलिनीकरणाचा तिढा सुटण्याऐवजी वाढतचं चालला आहे. राज्य सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. एसटी सेवा बंद असल्याने राज्यातील जनतेचे मात्र हाल होतं आहेत. lत्यामुळे राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांतील संघर्ष दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. त्यातचं आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी एसटीचं विलिनीकरण शक्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

“एसटीचं विलिनीकरण कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाका. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार नाही. कुणाचेही सरकार असेल, तरी ते शक्य होणार नाही. पगारवाढीमुळे भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे एसटी विलिनीकरण करता येणार नाही,” असं अजित पवारांनी सभागृहात बोलताना स्पष्ट केलं.

सध्या विलिनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयाकडे आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विलिनीकरणावर अहवाल देण्यासाठी समिती स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी या समितीच्या अहवालाची वाट पाहत आहेत. त्यातचं अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टिका केली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणात काय अडचण आहे? राज्याची तिजोरी कशासाठी आहे हे मला कळतंच नाही. नाही देत जा असं म्हणून चालतं नाही. गेंड्याच्या कातडीचे सरकार झाले आहे,” असा घणाघात पाटील यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, फोटो शेअर करत म्हणाले…

माया इथंच संपत नाही! सुपेंकडे पुन्हा सापडलं ‘इतक्या’ लाखांचं घबाड

पंजाब सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांचं ‘इतक्या’ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार

‘एवढा स्टाफ काय करतो, काय झोपा काढतो काय’; अजित पवार संतापले

धक्कादायक! विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More