बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उठा उठा आषाढी आली, स्वबळावर गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली”

मुंबई | आषाढी एकादशीनिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यासाठी मुख्यमंत्री मुसळधार पावसात स्वतः ड्रायव्हिंग करत विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावरून भाजपसह अनेक विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केलेली पाहायला मिळाली. अशातच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

सदाभाऊ खोत सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालवत पंढरीला जायची वेळ झाली, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पावसाचा धोका लक्षात घेता नेहमीची मर्सिडिज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरला रवाना झाले होते.

खराब हवामानामुळं विमानानं जाणं शक्य नसल्यामुळं त्यांनी रस्त्याच्या मार्गानेच पंढरपूरला जाणं पसंत केलं. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील होते. सध्या कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, नवी मुंबईल, पालघर, रायगड पट्ट्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीनं दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातच विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक मुलांच्या माळांची सजावट केली आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

“राहुल गांधींनी दाखवून दिलंय, कुणाची दादागिरी आता चालणार नाही”

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अटक, कारण ऐकून हैराण व्हाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न

“दरवर्षी मुंबई तुंबते…तीन पिढ्यांपासून बीएमसी चालवणारं ठाकरे कुटुंब फेल”

“माझ्यानंतर सलमानच्या किती गर्लफ्रेंड होत्या माहित नाही, मी त्याच्या संपर्कात नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More