बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लॉकडाऊन उठवा… अन्यथा रस्त्यावर उतरुन आम्ही स्वतः दुकानं उघडी करु”

सांगली | कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी ठिक-ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र या लाॅकडाऊननं अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हळूहळू कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना लाॅकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. अशातच आता भाजप खासदार संजय काका पाटील यांनी दोन दिवसांत लाॅकडाऊन उठवण्यासाठी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन उठवा अन्यथा दोन दिवसांत रस्त्यावर उतरून दुकानं उघडी करू, असा इशारा भाजप खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे. येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर भाजपचे आमदार आणि खासदार स्वत:हून दुकाने उघडी करतील, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात अजूनही कोरोना रूग्णांचं प्रमाण कमी झालं नसल्यानं तिथे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांना आता विरोध होत असून दुकाने सुरु करु द्यावीत, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागलेली आहे. रोजचा आकडा हा हजारांच्या घरात पोहोचत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्याचा 19 जुलैपर्यंत चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाचं संकट जात नाही तेच दुसरं संकट, बर्ड फ्ल्यूमुळे देशात पहिला मृत्यू

Ind Vs Sri: चहरनं केला कहर, भारत हारता हारता वाचला!

“पेगॅससचे खरे बाप देशातच”; सामनातून शिवसेनेची ‘ही’ आक्रमक मागणी

“तेव्हा मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्ही कधी करणार?”

“म्हणून मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More