बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लस घ्या आणि बाहुबली व्हा’; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

नवी दिल्ली | आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. मोदींनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वांनी कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन केलं. कोरोना विरोधातील लढाईत सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असंही यावेळी मोदींनी सांगितलं.

कोरोना संकटकाळात लस घेण्याचं आवाहन करत नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, लस दंडावर घेतली जाते. त्यामुळेच कोरोना विरोधातील लढ्यात लस घेतलेला बाहुबली बनतो. 40 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कोरोनाविरोधात बाहुबली होऊन लढा देऊयात.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचं असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आता पर्यंत 40 कोटी पेक्षा जास्त लोक कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, कोरोना साथीच्या संदर्भात संसदेत अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी. तसेच विरोधकांकडून याबाबत जे काही पर्याय, सल्ले देण्यात येतील त्यामुळे कोरोनाची लढाई अधिक वेगानं लढता येईल. कोरोनावर चर्चा केली गेली पाहिजे. देशाच्या जनतेला उत्तर हवं आहे, ते उत्तर देण्यासाठी सरकारची तयारी असल्याचंही मोदींनी म्हटलं.

 

थोडक्यात बातम्या – 

नेहा धुपियाने दिली गोड बातमी, पुन्हा एकदा होणार आई

‘महिला, दलित आणि शेतकरी मंत्री झालेले बघवत नाही’; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदी आक्रमक

जिवंत असूनही अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा; तक्रार केल्यानंतर मिळालं हे अजब उत्तर

‘100 रूपये द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या’; भाजप नेत्याची भन्नाट आयडिया

‘सेल्फ केअरच्या नावाखाली स्वत:चं नुकसान करतोय’; अमिर खानच्या मुलीने केला मोठा खुलासा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More