बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लस घ्या आणि मिळवा मोफत बिर्याणी’; ‘या’ ठिकाणी राबवली जातेय अनोखी योजना

चेन्नई | देशात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. कोरोना लस घेण्याबाबत अजूनही अनेक लोक नकार देताना दिसत आहेत. अशातच एका ठिकाणी लस न घेणाऱ्यासांठी लस घ्यावी म्हणून एक योजना केल्याचं समोर आलं आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लस घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे.

चेन्नईमधील एका गावात असा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. एसएटीएस फाउंडेशनमार्फत हे काम केलं जात आहे. मासेमारी करणाऱ्यांची लोकसंख्या अधिक असणाऱ्या गावातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत बिर्याणी देण्याची योजना सुरु केलीय. विशेष म्हणजे गावात लस घेणाऱ्या प्रत्येकाला लकी ड्रॉ योजनेमध्येही सहभागी होता येणार आहे.

एसएटीएस फाउंडेशनच्या सुंदर यांनी या योजनेनंतर प्रतिसाद वाढल्याचं सांगितलं आहे. ‘मागील तीन दिवसांमध्ये 345 जणांचं लसीकरण झालं आहे. लकी ड्रॉ योजनेमुळं अनेकजण लसीकरण करुन घेत आहेत. बिर्याणी आणि लकी ड्रॉमध्ये भाग घेता येईल म्हणून लोक पुढं येत आहेत,’ असं सुंदर म्हणाले.

दरम्यान, हा एक आठवड्यासाठी लकी ड्राॅ असून यामध्ये मोफत भेट वस्तू विजेत्यांना देण्यात येतात. यात मिक्सर, ग्राइण्डर, सोन्याची नाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एक बम्पर ड्रॉ सुद्धा ठेवण्यात आला असून यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन आणि अगदी स्कूटर जिंकण्याची संधी लस घेणाऱ्यांना आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा…,’; केंद्र सरकारचा इशारा

कौतुकास्पद! सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसल्यानं 3 वर्षाची चिमुकली एकटीच गेली डाॅक्टरकडे

ऑलम्पिकमध्ये खेळाडूंना मिळणार 1 लाख 60 हजार कंडोम पण या कारणामुळे ते वापरू शकणार नाहीत

काहीही झालं तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाही असं वाटत होतं, पण…- देवेंद्र फडणवीस

“देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More