बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बॅंडवाले जसे जिकडे सुपारी मिळेल तिकडे वाजवायला जातात तसं तुमचं झालंय का?”

पुणे | लेखक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांनी ‘जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायचीय!’ या त्यांच्या लेखामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेबद्दल मत व्यक्त केलं आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भवितव्याची काळजीही त्यांनी व्यक्त केली. सगळ्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे असे पोटतिडकीने ओरडून सांगणारे राज ठाकरे जगाला हेवा वाटेल अशा कोलांटउड्या मारताहेत. असा टोलाही त्यांनी या माध्यमातून लगावला.

नानार प्रकल्प असो किंवा टोलनाक्याचं आंदोलन राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेवर प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं, असं बोलून त्यांनी ‘बँडवाले जसे जिकडे सुपारी मिळेल तिकडे वाजवायला जातात, तसं तुमचं झालंय का? स्वतःशी तरी प्रामाणिक राहा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं बँडपथक होऊ देऊ नका’, असं राज ठाकरे यांना उद्देशून म्हटलं आहे.

घनश्याम पाटील पुढे म्हणतात, कोणाचेही लग्न असेल तरी बँडवाला हा हजर असतो आणि बँड चांगला वाजतो म्हणून लोकही ते ऐकतात, त्या बँडवाल्यापेक्षा तुमचं स्टेटस खूप मोठं आहे, याचा तुम्हाला विसर पडतोय का? असा प्रश्न या माध्यमातून पाटील यांनी राज ठाकरे यांना विचारला आहे. “उत्कृष्ट वक्तृत्व असणं एवढच नेतृत्वाला पुरेसं नसून, न भिता नेतृत्व करणारा चांगलं नेतृत्व करू शकतो. एकेकाळी तडीपार असलेले अमित शहा सध्या देशाचे गृहमंत्री आहेत. तर तुम्ही एकीकडे मराठी पोरा लढायला सांगताय आणि मी तुमच्या पाठीशी असल्याचा धीर देताय. तर दुसरीकडे एका ईडीच्या चौकशीला काय घाबरता?” असं म्हणत घनश्याम पाटील यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ पासून ‘राहू दे तो व्हिडिओ’पर्यंत केवढ्या भूमिका तुम्ही बदलल्या? असा प्रश्न उपस्थित केला.

बेळगावचा सीमाप्रश्नात मनसेचं अस्तित्व दाखवून द्यायला हवं होतं आणि 15 वर्षात मराठीभाषेसाठी काय केलं? याचं उत्तर आता राज ठाकरेंनी द्यायला हवं होतं, असंही पाटील यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या एकूण कारकिर्दीचा लेखाजोगाच जणू त्यांनी आपल्या लेखाद्वारे मांडला आणि “एकदा स्वतःचे मूल्यमापन स्वतः करा या सिंहावलोकनातून काही चांगले साध्य झाले तर आम्हाला आनंदच वाटेल.” असं म्हणत घनश्याम पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावरच्या लेखाचा शेवट केला.

थोडक्यात बातम्या

“येत्या 40 दिवसात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागेल”

करिनाच्या धाकट्या लेकाचा फोटो चुकून झाला व्हायरल; असा दिसतो तैमुरचा लहान भाऊ

आयपीएलवर कोरोनाचं सावट; आणखी 14 कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

आयपीएलआधीच शुभमन गिलचा ट्रेलर; 35 चेंडूत काढल्या एवढ्या धावा

गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More