घाटकोपरमध्ये इमारत कोसळली, ३० ते ४० जण अडकले

मुंबई | घाटकोपरच्या श्रेयस सिनेमाजवळील चार मजली रहिवासी इमारत कोसळलीय. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. आणखी ३० ते ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून मदतकार्य सुरु आहे.

इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमचं नुतनीकरण सुरु होतं. मात्र वरच्या मजल्यांवर लोक राहात होते. ते या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

दरम्यान, ही इमारत ४० वर्षे जुनी असल्याची माहिती आहे. तसेच तिला तडे गेले होते असंही समजतंय.