इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, शिवसेना पदाधिकाऱ्याला बेड्या

मुंबई | घाटकोपर इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितपला बेड्या ठोकण्यात आल्यात. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

साईदर्शन इमारतीच्या तळमजल्यावर छेडछाड करुन सुनील शितपनं नर्सिंग होमचं नुतनीकरण केलं होतं. यामुळेच इमारत कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. 

दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी या इमारतीची पाहणी केली. तसेच १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या