“सुनीलला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर मी त्याला कापेन”

मुंबई | घाटकोपर इमारत दुर्घटनेला जबाबदार सुनील शितपला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर मी त्याला कापेन, अशा शब्दात ललित ठक यांनी आपला संताप व्यक्त केला.

या दुर्घटनेत ललित यांनी आपली ३ महिन्यांची चिमुरडी गमावली असून त्यांची पत्नी सध्या आयसीयूमध्ये आहे, तर आईचा शोध अद्याप लागलेला नाही. 

‘सकाळी मी तयारी करत होतो, तेव्हा काहीतरी हलल्यासारखं झालं. मुलगी, पत्नी आणि आईला मी घराबाहेर पडण्यास सांगितलं. तेवढ्यात इमारत कोसळली, हे सांगताना ललित यांना अश्रू अनावर झाले.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या