नव्या घरात जाण्यासाठीची ‘त्यांची’ धडपड कायमची थांबली!

मुंबई | घाटकोपर इमारत दुर्घटनेत तिसऱ्या मजल्यावर राहणारं अजमेरा कुटुंबही उद्ध्वस्त झालंय. पारस अजमेरा यांनी एलबीएस मार्गावरील खारावाडी परिसरात नवा फ्लॅट विकत घेतलाय. पुढच्या आठवड्यात ते नव्या घरात प्रवेश करणार होते.

विद्याविहारमध्ये राहणारे सुतार गुज्जर त्याच फ्लॅटच्या फर्निचरची बोलणी करण्यासाठी अजमेरा यांच्याकडे आले होते. बोलणी सुरु असताना तळमजल्यावरील आरडाओरडा ऐकून सगळे बाहेर पडले. मात्र तेवढ्यात इमारत कोसळली. 

या दुर्घटनेत अजमेरांची पत्नी दिव्या आणि फर्निचरच्या कामासाठी आलेले गुज्जर यांचा मृत्यू झालाय. तर मुलगी निराली बेपत्ता आहे. मुलगा सिद्धांत कामावर गेल्याने बचावलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या