होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू!

Ghatkopar Hording Collaps | नुकताच मुंबई आणि ठाणे येथे अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटनेमुळे अनेकांचे जीव धोक्यात होते. तब्बल 120 लोकं या होर्डिंग दुर्घटनेत अडकली होती. तसेच त्यानंतर 16 जण मृत्युमुखी पडले होते. त्यात आता अभिनेता कार्तिक आर्यनचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते तेव्हा कार्तिक आर्यन देखील त्याठिकाणी उपस्थित होता. (Ghatkopar Hording Collaps)

अवकाळी पावसाने मुंबई आणि ठाणे भागात धिंगाणा घातला होता. तेव्हा वादळी वाऱ्याने देखील हाहाकार माजला होता. यामुळे घाटकोपर येथील भलं मोठं होर्डिंग खाली असलेल्या पेट्रोल पंपावर पडल्याने अनर्थ झाला. पेट्रोल पंप देखील जमीनदोस्त झालं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी अनेक बचाव कार्याच्या माध्यमातून आपले हात पुढे सरसावले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

कार्तिक आर्यनच्या नातेवाईकांचा होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू

या दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनचे मामा आणि मामीचा मृत्यू झाला. घटनेनंतर 50 तासानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. तेव्हा तो मृतदेह ओळखणंही अवघड होऊन बसलं होतं. तेव्हा अंगठीवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. (Ghatkopar Hording Collaps)

60 वर्षीय मनोज चंसोरिया हे एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांची पत्नी अनिता 59 वर्षीय होत्या. मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तेव्हा कार्तिक आर्यन देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मनोज चंसोरिया आणि त्यांची पत्नी हे कारने प्रवास करत होते. तेव्हा त्यांना कारमध्ये पेट्रोल भरायचं होतं. तेव्हा त्यांनी आपली कार तिथं थांबवली, मात्र त्यावेळी अनर्थ झाला. तेव्हा भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपवर आदळलं आणि जे व्हायला नको होतं तेच झालं. दोघेजण तेव्हा आपल्या घरी मध्यप्रदेशला जात असताना ही घटना घडली. (Ghatkopar Hording Collaps)

व्हिसाच्या कामासंबंधीत अभिनेत्याचे नातेवाईक मुंबईत आले असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. होर्डिंगच्या दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान अमेरिकेत असलेला मुलगा भारतात आला. तेव्हा त्याने आपल्या आई-बाबांना एका अंगठीवरून ओळखले असल्याची माहिती समोर आली.  (Ghatkopar Hording Collaps)

News Title – Ghatkopar Hording Collaps In Actor Kartik Aaryan Relatives Die

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! ‘या’ तारखेला लागणार बारावीच्या निकाल?; बोर्डाकडून महत्वाची अपडेट

“माझ्याकडून काही चुका…”; मुलगा सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?

राखीची तब्येत नाजूक, ‘या’ आजाराशी करतेय सामना?; एक्स नवऱ्याकडून खुलासा

“ईडीने जप्त केलेले पैसे मी गोरगरिबांना देणार”, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

कोवॅक्सिन लसीने चिंता वाढवली; नागरिकांमध्ये आढळतायेत हे गंभीर आजार