बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ उड्डाणपुलाला शरद पवारांचं नाव द्या; राष्ट्रवादीची मागणी

मुंबई | घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अय्युब शेकासन यांनी ही मागणी केली आहे.

अय्युब शेकासन यांनी यासंदर्भात मंत्री नवाब मलिक आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं नामकरण करावं असं म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भरीव योगदान दिले आहेत. शरद पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करण्यासाठी पालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी अय्युब शेकासन यांनी केली आहे.

दरम्यान, माझ्या मागणीवर सकारात्मक विचार होऊन ही मागणी पूर्णत्वास येईल. याची मला खात्री आहे, असंही अय्युब शेकासन यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मनसुख यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

महाविकास आघाडीतील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

‘या’ जिल्ह्यातील चार टोळींमधील 18 गुंडांना केलं तडीपार

प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना? – चित्रा वाघ

राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More