तुम्ही खात असलेलं तूप शुद्ध आहे की अशुद्ध?, ‘या’ टिप्समुळे फसवणूक टळू शकते

Ghee purity test at Home | सध्या बाजारात प्रत्येक गोष्टीत भेसळ पाहायला मिळते. अन्न पदार्थांमध्ये तर सपशेल भेसळ केली जाते. मोठ-मोठे ब्रँडही शुद्धतेची गॅरंटी देतात. पण, त्याची गुणवत्ता खरंच तितकी शुद्ध आणि चांगली असते का?, याबाबत तुम्ही जागृत ग्राहक बनून तपास करू शकता.भारतात तूप जवळपास सगळीकडेच खूप आवडीने खाल्लं जातं.

तूप खाल्ल्याने रूप येतं असं म्हणतात. पण, याच तुपात जर भेसळ असली तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होत असतात. आता तुम्ही खात असलेलं तूप शुद्ध आहे की अशुद्ध हे ओळखायचं असल्यास ते शक्य आहे. या लेखात काही टिप्स दिल्या आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही घरीच पडताळणी करू शकता.

शुद्ध देशी तूप कसं ओळखाल?

हातावर घासा : शुद्धता ओळखण्यासाठी तुम्ही हातावर तूप घासून हे ओळखू शकता. यासाठी हातावर तूप घासा जर हे तूप हातावर घासल्यानंतर लगेच विरघळत असेल तर समजायचे की हे तूप शुद्ध आहे पण विरघळण्यासाठी वेळ लागत असेल तर समजायचे की या तूपात भेसळ आहे.

तूप गरम करा : बाजारातून आणलेलं तूप (Ghee purity test at Home) पातेल्यात घेऊन गरम करून बघा.जर तूप लवकर विरघळत असेल आणि तपकीरी रंग येत असेल तर ते शुद्ध तूप असेल. जर, तूप गरम केल्यानंतर विरघळण्यासाठी वेळ लागत असेल आणि पिवळा रंग येत असेल तर ते तूप भेसळयुक्त आहे.

पाणी वापरुन बघा : एक ग्लास पाणीमध्ये एक चम्मच तूप टाका. जर तूप पाण्याच्या वर तरंगत असेल तर तूप शुद्ध आहे पण पाण्याच्या तळाशी साचून राहिले तर तूप भेसळयुक्त आहे.

मीठ : एका पातेल्यात एक चम्मच तूप टाका आणि त्यात चिमुटभर मीठ घाला आणि त्यात थोडे हायड्रोक्लोरीक अ‍ॅसिड टाका. अर्धा तासानंतर जर या तूपाचा रंग बदलला तर तूप भेसळयुक्त असेल आणि जर रंग बदलला नसेल तर समजायचे की तूप शुद्ध आहे. या टिप्सद्वारे तुम्ही घरीच तुपाची शुद्धता तपासू शकता.

News Title : Ghee purity test at Home

महत्त्वाच्या बातम्या-

राहुल गांधीचं भवितव्य आज ठरणार; देशातील 88 मतदारसंघात मतसंग्राम

‘या’ भागावर अवकाळी पावसाचं संकट कायम; यलो अलर्ट जारी

‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात दुप्पट फायदा होईल!

अंबादास दानवेंचा मास्टरस्ट्रोक, थेट एकनाथ शिंदे यांचा ‘तो’ व्हिडीओ केला पोस्ट

‘जावई 25 व्या वर्षात 2 फ्लॅटवाला पाहिजे’; पुण्यातील तरूणाने पालकांना दाखवला आरसा