देश

परदेशी गाय माता नव्हे आंटी; भाजप नेत्याचं हास्यास्पद वक्तव्य

कोलकाता |  देशी गायीच्या दुधात सोनं असतं म्हणूनच ते पिवळसर दिसतं. तर परदेशी गाय माता नाही तर आपल्या मावशा (आंटी) असतात, असं अजब वक्तव्य बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी केलं आहे. तसंच गोमांस खाणाऱ्या बुद्धीजीवी वर्गावर देखील त्यांनी आगपाखड केलीये. त्यांनी काय खायचं ते घरात खावं रस्त्यावर नाही, असं ते म्हणाले आहेत.

गाय ही आमच्यासाठी माता आहे. तिचं दुध पिऊन आम्ही जिवंत राहतो. जर माझ्या आईसोबत कुणी गैरव्यवहार केला तर आम्ही त्यांच्याशी जसं वागायला पाहिजे तसंच वागू, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.

भारतासारख्या पवित्र भूमीवर गायींची हत्या आणि गोमांस खाणं हा गुन्हाच आहे, असंही घोष यांनी म्हटलं आहे. गोवंश हत्येचा आम्ही सातत्याने विरोधी करत राहू, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आपण ज्या परदेशी प्रजातींच्या गायी आणतो त्या आपल्या हिताच्या नाहीत. त्यांचा आवाजही देशी गायींप्रमाणे नसतो. त्या आपल्या गोमाता नसतात, तर मावशा असतात. आपण या मावशांची पूजा केली, तर ते देशाच्या हिताचं नाही, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या