बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महापौरांच्या कार्यालयात भूत? गार्डसोबत घडला भयानक प्रकार, महापौरांनीच शेअर केला व्हिडीओ!

बगोदा | सोशल मीडियावर रोजच जगभरातील अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओजमध्ये काहीवेळा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या अविश्वसनीय घटना देखील पाहायला मिळतात. सध्या कोलंबियाच्या आर्मोनिया शहरातील अशाच एका अविश्वसनीय घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ महापौर जोस मॅनुअर रियोस मोरालेस यांनी शेअर केला आहे. महापौरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये महापौरांच्या कार्यालयातील गार्डला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. हा प्रयत्न महापौर कार्यालयातील भूतानेच केला असल्याचा दावा, महापौरांनी केला आहे.

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये गार्ड चालताना दिसत आहे. यावेळी अचानक गार्ड हवेत उडतो आणि भिंतीवर आदळतो. यानंतर कोणीतरी गार्डचे हातपाय धरुन त्याला खेचताना दिसते. मात्र, गार्डला नेमकं कोण मारत आहे, हे व्हिडीओमध्ये दिसत नाही.

ज्यावेळी गार्डला मारहाण होत असते त्यावेळी गार्ड सोडून तिथे दुसरा कोणीच व्यक्ती नसतो. मग गार्डला नेमकं कोण मारहाण करत आहे, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महापौर जोस मॅनुअर रियोस मोरालेस यांच्यासोबत नेटकरी देखील त्याठिकाणी भूत असल्याचं बोलू लागले आहेत.

थोडक्यात बातम्या –

खळबळजनक ! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील तीन रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

पॉर्न पाहण्यासाठी पती टाकायचा दबाव, पत्नीने केलं असं काही की…

आनंदाची बातमी! कोरोना लढ्यात भारतामध्ये आणखी एका लसीला मान्यता, केंद्रीय आरोग्य मंत्र्याची घोषणा!

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल…”

“चंद्रकांत पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत, दिल्ली हाय कमांड त्यांच्या पाठीशी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More