कीव | रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी हल्ल्याचे आदेश देताच रशिया-युक्रेन वादाला सुरूवात झाली. रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. महाकाय रशियन फौज युक्रेनच्या रस्त्यावर असल्याचं समोर आलं आहे.
युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी रशिया अखेरच्या आणि मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. युक्रेनच्या रस्त्यावर महाकाय रशियन सैन्याचा ताफा असल्याचं सॅटेलाइट फोटोतून समोर आलं आहे. त्यामुळे सैन्याची संख्या वाढवून रशिया मोठा हल्ला घडवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजधानी कीवपासून 18 मैल असलेल्या प्रिबिर्स्क शहराच्या रस्त्यांवर रशियन सैन्याचा ताफा पसरला आहे. कीवजवळील एंटोनोव एअरपोर्टजवळ 40 मैल रशियन सैन्याचा ताफा पसरला आहे. त्यात पुतिन यांनी रशियन सैन्याला 24 तासांचं अल्टिमेटम दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, युक्रेनवरील हल्ल्याचा शेवट हा 2 मार्चपर्यंत झाला पाहिजे असे आदेश पुतिन यांनी रशियन सैन्याला दिले असल्याची माहिती रशियाचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई फेडरोव यांनी दिली. त्यामुळे युक्रेनवर ताबा मिळवून युद्ध संपवण्यासाठी आता रशियाकडे 24 तास आहेत. तर रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने राजधानीच्या चहुबाजूने सुरक्षा कवच तयार केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
युक्रेनमधून 182 विद्यार्थी मुंबईत, नारायण राणेंनी विमानतळावर केलं स्वागत
डायबिटीज पेशंट असाल तर ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश, शुगर राहिल कंट्रोलमध्ये
रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला, सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला
अमेरिकेकडून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न, भडकलेल्या पुतिन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“डॉक्टर नालायक हरामखोर आहेत, ते मारखाण्याच्या लायकीचे आहेत”
Comments are closed.