Giorgia Meloni-Narendra Modi | G7 शिखर परिषदेसाठी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर गेले आहेत. G7 परिषद ही इटलीत असल्याने यजमान देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आलेल्या नेत्यांचे स्वागत केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही स्वागत करण्यात आलं.
या दरम्यान मेलोनी यांनी मोदींचं उत्साहाने स्वागत केलं. तसंच एकत्र एक सेल्फी देखील घेतला. सोशल मीडियावर मोदींच्या या भेटीतील अनेक फोटोही व्हायरल झाले. मात्र, यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सेल्फीने.
मोदी आणि मेलोनी यांच्या सेल्फीने इंटरनेटव धुमाकूळ
यावेळी मेलोनी यांनी मोदींचं अतिशय (Giorgia Meloni-Narendra Modi) उत्साहात दोन्ही हात जोडून भारतीय संस्कृतीप्रती आदर व्यक्त करत मोदींचं स्वागत केलं. यावेळी मोदी आणि मेलोनी यांनी फोटोसाठी पोझही दिल्या. मेलोनी यांनी या भेटीचा एक व्हिडिओ त्यांच्या एक्सवर (पूर्वीचे ट्वीट) पोस्ट केला आहे.
फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी “हॅलो फ्रेंडस..फ्रॉम #Melodi”, असं कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट काही तासातच वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. या पोस्टला तासाभरातच 5 मिलियनपेक्षा अधिक वह्यूज मिळाले आहेत.
Hi friends, from #Melodi pic.twitter.com/OslCnWlB86
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) June 15, 2024
नेटकऱ्यांच्या उमटल्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर नेटकरी अनेक (Giorgia Meloni-Narendra Modi) प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, “हे ट्विट सर्व रेकॉर्ड मोडेल.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “वैयक्तिक स्तरावर जागतिक नेत्यांना जुळताना पाहून आनंद झाला!”, अशा प्रतिक्रिया आता या पोस्टवर उमटत आहेत.
दरम्यान, मागील दोन वर्षांमध्ये मेलोनी दोन वेळा भारत दौऱ्यावर आल्या होत्या.या दौऱ्यामुळे भारत आणि इटली या दोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्यास मदत झाल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. आता त्यांचे फोटो आणि व्हिडिओ ट्रेंडमध्ये आले आहेत.
News Title – Giorgia Meloni-Narendra Modi Selfie
महत्त्वाच्या बातम्या-
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंचा मोठा गौप्यस्फोट!
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; येणारे दोन दिवस..
मोठी बातमी! नितीश कुमारांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात केलं दाखल
“अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला”; उद्धव ठाकरेंनी डिवचलं