नोकऱ्या नाहीत म्हणणाऱ्यांनो चष्मे बदला- गिरीराज सिंह

नवी दिल्ली | भाजप सरकारच्या काळात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही, अशी टीका होतेय. मात्र अशा लोकांनी आपले चष्मे बदलण्याची गरज आहे, असं केंद्रीय लघु उद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलंय. 

छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात दरवर्षी 10 कोटी लोकांसाठी सरकार नोकऱ्या उपलब्ध करुन देत असल्याचा दावाही गिरीराज सिंह यांनी केलाय. 

वास्तव वेगळं आहे. देश बदलत आहे मात्र काही लोकांना सरकारवर टीका करण्यातच स्वारस्य आहे. त्यांनी पहिले आपला चष्मा बदलावा, असं सिंह म्हणालेत.