नवी दिल्ली | सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं, असं वक्तव्य केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी केलं आहे. पुर्णिया येथे गिरीराज सिंह माध्यमांशी बोलत होते.
भारत स्वातंत्र्याची आणि फाळणीची आठवण करत 1947 मध्येच सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यायला हवं होतं, असं सिंह यांनी म्हटलं आहे. त्यावेळी आपले पूर्वज स्वतंत्र्यासाठी लढा देत होते. तर जीना इस्लामिक स्टेट बनविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
देशात नागरिकता संशोधन कायद्याच्या आडून भारत विरोधी अजेंडा राबविण्यात येत आहे. नागरिकता संशोधन कायद्यासंदर्भात पाकिस्तान जी भाषा बोलत आहे तीच भाषा काँग्रेस, जेडीयू आणि कम्युनिस्ट बोलत असल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे.
जो आमच्या धर्माशी पंगा घेईल तो नष्ट होईल. हैदराबादमध्ये तर सीएए मागे न घेतल्यास आम्ही शांत बसणार नाही, भारताचे तुकडे-तुकडे करू असं अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणतात, असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
महाविकास आघाडी सरकार फक्त योजना बंद करत सुटलं आहे का?; जयंत पाटील म्हणाले…
उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभेवर पाठवण्यास संजय काकडेंना आक्षेप
महत्वाच्या बातम्या-
देशातील 25 सक्षम महिलांच्या यादीत नवनीत राणा यांचा समावेश
बैठ जाओ चचा! स्वरा भास्करने वारीस पठाण यांना घेतलं फैलावर!
मार्चमध्ये लाँच होणार सर्वात स्वस्त आयफोन; जाणून घ्या किंमत?
Comments are closed.