पाटणा | ममतांची दादागिरी आता फार काळ सहन केली जाणार नाही. त्यांचा उलटा प्रवास सुरू झाला असून जनताच त्यांचे श्राद्ध घालेल, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रिय मंत्री गिरिराज सिंह यांनी केलं आहे.
ममता बॅनर्जी उत्तर कोरियातील नेते किम जोंग उन यांची भूमिका बजावत आहेत, अशी बोचरी टीका गिरिराज सिंह यांनी केली आहे.
ममता बॅनर्जी ज्या प्रकारे सरकार चालवतात हे पाहून त्या देशाच्या घटनेला जुमानत नसल्याचं दिसत आहे, असं म्हणत गिरिराज सिंह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, ममतांची अहंकारी वृत्ती जनतेसमोर येत असून त्यांची सत्ता फार काळ टिकणार नाही, असं गिरिराज सिंह म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-औरंगाबादचा पराभव हा फक्त चंद्रकांत खैरेंचा नाही तर तो माझासुद्धा आहे- उद्धव ठाकरे
-आदित्य ठाकरे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री???
-तुम्ही चिंता करु नका, शांत राहा; आमचं सगळं ठरलंय!
-धोनी झुकणार की आयसीसीचा निर्णय झुगारणार?
-११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन मृतदेह स्मशानभूमीत फेकला
Comments are closed.