बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधीना शाळेत पाठवण्यात यावं”

नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची कोणतीच संधी भाजप सोडत नाही. तर या आधीही भाजपनेे काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर तमिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या सभेमध्ये टीका केली होती. त्यानंतर सध्या चालू असलेल्या लोकसभेच्या सत्रात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी भर लोकसभेत राहुल गांधीना टोले लगावले आहेत.

मस्यपालनासाठी वेगळं स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात यावं, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. पण पड्डूचेरी आणि कोचीला गेल्यावर काही दिवसातच त्यांना असा विभाग कार्यरत असल्याचा विसर पडला आहे, असा टोला गिरीराज सिंग यांनी लगावला. राहुल गांधींच्या ज्ञानात भर पडावी म्हणूून त्यांना शाळेत पाठवण्याची गरज असल्याचंही गिरीराज सिंग म्हणाले.

मत्सपालन क्षेत्राला प्रोत्साहन मिळावं यासाठी लोकसभेत भाजप खासदार सुनिता दुग्गल भाषण करत होत्या. तेव्हा गिरिराज सिंग उठून बोलू लागले. आमचं सरकार आल्यावर आम्ही स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू, असं राहुल गांधी म्हणाले होते. यावरून राहुल गांधी यांच्या स्मरण शक्तीला काय झालंय माहित नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे मी दुखावलो गेलोय, असा खोचक टाेला गिरीराज सिंग यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, राहुल गांधी सध्या दक्षिण भारतातील राज्यांवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. तमिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांसह पश्चिम बंगाल, आसाम आणि पडडुचेरी विधानसभा निवडणूका लागल्या आहे. त्यामुळं या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

थोडक्यात बातम्या-

…अन् भरबैठकीत नाना पटोले संतापले; ‘या’ मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर व्यक्त केली नाराजी

सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून सभागृहात राडा; फडणवीसांनी केले गंभीर आरोप

कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More